
खानापूर : नियती फौंडेशन आणि श्री गुरुदेव फौंडेशन यांच्या वतीने उद्या दिनांक 20 जुलै रोजी डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सर्वत्र डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजाराने थैमान घातले आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियती फौंडेशनतर्फे सदर लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उद्या शनिवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत खानापूर येथील नियती को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कार्यालयात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, तरी खानापूर शहर व परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नियती फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta