खानापूर : नियती फाउंडेशन आणि श्री गुरुदेव फाउंडेशन यांच्यावतीने आज शनिवार दिनांक 20 जुलै रोजी डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीर नियती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी बसवराज हापळी, ऍड. रुद्रगौडा पाटील व नियती को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कर्मचारी उपस्थित होते. या शिबीराचा खानापूर तसेच परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.