बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
खानापूर तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन सद्यस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि नदी-नाल्यांची पाणी पातळी तपासली.
तालुक्यातील कुसमळी गावातील पुलाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांचीही उपस्थिती होती.
Belgaum Varta Belgaum Varta