खानापूर (वार्ता) : निडगल (ता. खानापूर) येथील गावच्या नाल्याजवळ बुधवारी दि. 29 रोजी सायंकाळी वाहनाची धडक बसून गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, निडगल गावाजवळील नाल्याजवळ गर्लगुंजीहून खानापूरकडे जाणार्या ईको मारूती व्हॅनने निडगल गावचा शेतकरी श्रीकांत पाटील यांच्या गाईल जोराची धडक दिल्याने गाय बाजुच्या खड्ड्यात उडून पडल्याने तिचा मृत्यू झाला. मात्र ईको व्हॅन पसार झाली.
यावेळी वाहनाचा पाठलाग करण्यात आला. पण वाहन सापडले नाही. यात निडगलच्या शेतकर्याचे 50 हजार रूपयाचे नुकसान झाले. सदर घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थानकात नोंदविण्यात आली आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
Check Also
शिरोली येथील बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा; डॉ. अंजली निंबाळकर यांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील सर्वे नंबर 97 मध्ये खासगी जमिनीत बेकायदेशीररित्या …