Saturday , December 14 2024
Breaking News

जनतेचा विश्वास सार्थ ठरविणार

Spread the love

उत्तम पाटील : पत्रकार बैठकीत माहिती
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर विकास पॅनलच्या माध्यमातून अत्यंत चुरशीने लढवण्यात आलेल्या निवडणुकीत बोरगाव शहरवासीयांनी आपल्यावर जो विश्वास दाखवून आपल्या पॅनलच्या सर्वच उमेदवारांना सर्वाधिक मतांनी निवडून दिले आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून भावी काळात शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन युवा नेते उत्तम पाटील यांनी बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत दिले.
उत्तम पाटील म्हणाले, निवडणुकीदरम्यान आपण शहर विकास पॅनलच्या माध्यमातून जनतेला दिलेल्या जाहीरनाम्यातील सर्वच कामे टप्प्याटप्प्याने पूर्णत्वाला नेणार आहे. गावातील शुध्द पाणी घटक, स्वच्छता मोहिम, गावातील पथदीप या मूलभूत सोयींवर भर देत शहारातील प्रमुख मार्गावर रस्ते डांबरीकरण यासाराखी विकास कामे प्रारंभ करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने शहाराला भेडसावणार्‍या समस्या पैकी शहर सुरक्षेतेला प्राधान्य देण्यासाठी गावातील प्रमुख मार्गावर सीसीटीव्ही बसविण्याचे काम हाती घेणार आहे.
या निवडणुकीच्या वेळी सात गावातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी तसेच सुकाणू समिती सदस्यांच्या बरोबर आणि तेच हितचिंतक आणि जे परिश्रम घेतले. त्यामुळेच पुन्हा एकदा नगरपंचायतीवर आपली सत्ता प्रस्थापित झाली आहे. शिवाय जनतेने दिलेल्या विश्वासावर आपण प्रामाणिक कार्य करणार असल्याचेही शेवटी उत्तम पाटील सांगितले.
यावेळी सहकार नेते रावसाहेब (दादा) पाटील, मीनाक्षी पाटील, उद्योगपती अभिनंदन पाटील, धनश्री पाटील, धनश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, अनुराग पाटील, डॉ. शंकर माळी, अभय करोले, राजू मगदूम, बी. के. महाजन, मायप्पा कांबळे, सुरेखा घाळे, संगप्पा ऐदमाळे यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द

Spread the love  उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *