Monday , December 8 2025
Breaking News

निःपक्षपातीपणे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी; खानापूर तालुका काँग्रेसची मागणी

Spread the love

 

खानापूर : तालुक्यात यावर्षी जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्यात बऱ्याच घरांची पडझड होत आहे. पडझड झालेल्या घरांचे ताबडतोब पंचनामे करून तहसिलदार कार्यालयाकडे पाठवायचे आहेत. यासाठी पडझड झालेल्या घरांचे पंचनामे व्यवस्थित व्हावेत, पीडीओ व इंजिनियर यांनी लोकांना नाहक त्रास देऊ नये, स्वताच्या पगारातील पैसे द्यायचे असल्यासारखे जनतेशी वागू नये, सरकारचे पैसे आहेत लोकांना मिळू द्यात, गावचे राजकारण यात आणू नये, जो नुकसानग्रस्त आहे मग ते कोणीही असो निस्वार्थपणे पंचनामे व्हावेत यासाठी तहसीलदाराने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करावी, अशी विनंती खानापूर तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात तहसिलदार यांनी यासंदर्भात योग्य त्या सुचना आजच्या आज देतो असे सांगितले आहे. नुकसान भरपाईसाठी खालीलप्रमाणे तरतूद आहे.
A कॅटॅगरी – ५ लाख त्यासाठी पूर्णता किंवा ७५% पेक्षा जास्त घर पडलेले असले पाहीजे
B कॅटॅगरी – ३ लाख – त्यासाठी अर्धे घर म्हणजेच दोन भिती पडणे आवश्यक आहे
C कॅटॅगरी – ५० हजार – त्यासाठी १ भिंत पत्रे उडणे वगैरे अटी आहेत, अशी माहिती तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दिली.
तालुक्यात पुरामुळे अनेक नदी नाल्यावरील रस्ते बंद होताना दिसत आहेत. त्याठिकाणच्या परिस्थितीचा तयारीआढावा घेत जनतेला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी ही मागणी तहसिलदार यांचेकडे करण्यात आली.
तसेच जी झाडे जुनाट झाली आहेत ती रोडवर पडतात परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे. अशी झाडे तोडून टाकण्यास वनखात्यास सुचित करावे ही बाब तहसिलदारांच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी, ॲड ईश्वर घाडी, सुरेश जाधव, यशवंत बिरजे, दिपक कवठनकर, तोहीद चंदखन्नावर, गुड्डू टेकडी, यशवंत पाटील, राजू कब्बूर, रित्वीक कुंभार, रूद्राप्पा पाटील तसेच पत्रकार उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *