Tuesday , March 3 2026
Breaking News

मणतुर्गा येथे घर कोसळून नुकसान

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गे गावातील प्रकाश रावबा देवकरी, सूर्याजी गणपती देवकरी, हणमंत देवकरी यांच्या राहत्या घराची भिंत अतिवृष्टीमुळे कोसळली असून ती घराशेजारी असलेल्या श्री नागेश देव मंदिरावर पडली. त्यामुळे मंदिराचे देखील नुकसान झाले आहे. दुपारच्या वेळी देवकरी कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना भिंत कोसळली, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु देवकरी कुटुंबीयांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने देवकरी कुटुंबीयांच्या घराची तसेच नागेश देवस्थान मंदिराची पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तसेच नागेश देवस्थान हे मंदिर येथील पाटील कुटुंबीयांचे देवघर म्हणून ओळखले जाते तरी या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देवकरी कुटुंबीय तसेच मणतुर्गा ग्रामस्थातून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *