Tuesday , September 17 2024
Breaking News

खानापूर तालुका गॅरंटी योजना अनुष्ठान समितीची स्थापना; अध्यक्षपदी सूर्यकांत कुलकर्णी यांची नियुक्ती

Spread the love

 

खानापूर : कर्नाटक सरकारच्या महत्त्वकांक्षी योजना असलेल्या पाच गॅरंटी योजनाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने कमिट्यांची रचना केली आहे. जिल्हास्तरीय तालुकास्तरीय सरकारी नियुक्त कमिट्या करण्यात आल्या असून खानापूर तालुका गॅरेंटी योजना अनुष्ठान समितीच्या अध्यक्षपदी माडीगुंजीचे काँग्रेस कार्यकर्ते सूर्यकांत कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी मंजुनाथ आळवणी यांच्यासह 15 सदस्यांची समिती रचना करण्यात आली असून या रचनेचे कामकाज लवकरच खानापूर तालुका पातळीवर होणार आहे.

कर्नाटक सरकारने ५ गॅरंटी योजना व्यवस्थितपणे राबविण्यासाठी, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सरकारी कमिट्या स्थापन केल्या आहेत. खानापूर तालुक्यासाठीची कमिटी सुद्धा सरकारने स्थापन केली असून या कमिटीच्या नवीन सरकारी ऑफीसचे डागडुजीचे काम युद्धपातळीवर तालुक़ा पंचायतमध्ये चालू आहे. सदर कार्यालयाचे उद्घाटन लवकरच सेवेत राहणार आहे. या कमिटीचे सचिव किंवा नोडल अधिकारी म्हणून तालुक़ा पंचायच कार्यकारी अधिकारी हे काम पहाणार आहेत.
माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर व पालकमंत्री सतीश जारकीहोळी त्यांच्या शिफारशीनुसार नियुक्त करण्यात आली आहे. याबद्दल सरकार नियुक्त समितीचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

गॅरंटी योजना कमिटीतील सदस्यांची नावे खालीलप्रमाणे

सूर्यकांत कुलकर्णी (अध्यक्ष)
मंजुनाथ आळवणी (उपाध्यक्ष)
शांताराम गुरव (सदस्य)
विवेक तडकोड (सदस्य)
युसुफ हरगी (सदस्य)
⁠जगदीश पाटील (सदस्य)
रुद्रप्पा पाटील (सदस्य)
गोविंद पाटील (सदस्य)
संजय गावडे (सदस्य)
प्रियांका गावकर (सदस्य)
बाबू हत्तरवाड (सदस्य)
⁠प्रकाश मदार (सदस्य)
दीपा पाटील (सदस्य)
इसाक खान पठाण (सदस्य)
राजू कुदळे (सदस्य)

About Belgaum Varta

Check Also

लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!

Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *