खानापूर : पश्चिम घाटात सतत पडत असलेल्या पावसामुळे पुराचा धोका निर्माण झालेल्या खानापूर तालुक्यातील मलप्रभा पूल आणि रुमेवाडी बॅरेजला महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
खानापुरा तालुक्यातील पश्चिम घाट भागातील डोंगरांच्या मधोमध असलेल्या गावांना मूलभूत सुविधा पुरविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. येत्या काही दिवसात पावसामुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यात येणार आहे. वनविभागाच्या कठोर भूमिकेमुळे समस्यांवर तोडगा काढता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, घर पडल्यानंतर लगेच 1.20 लाख रुपये दिले जातात आणि 1.80 लाख रुपये राजीव गांधी गृहनिर्माण योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी दिले जातात. बेळगाव ते गोवा दरम्यानचा मुख्य रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद होतो, लवकरच गोवा मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण कण्यात येईल. लवकरच 100 कोटी खर्च करून हट्टीहोळी पूल बांधण्यात येणार आहे.
यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, पाटबंधारे व महसूल विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.