Sunday , April 27 2025
Breaking News

खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण

Spread the love

 

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आज शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी खानापूर तालुक्यातील जांबोटी सीआरसी, बैलूर सीआरसी व कणकुंबी सीआरसीच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण वडगाव (जांबोटी) प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी हे होते. जांबोटी सीआरसी अखत्यारीत येणाऱ्या आमगाव, चापोली, जांबोटी, कालमनी, ओलमनी, गवसे, हब्बनहट्टी, वडगाव, विजयनगर व आमटे तसेच कणकुंबी सीआरसी मधील चिगुळे, चिखले, चोर्ला, हुळंद, कणकुंबी, पारवाड, बे, हंदीकुपवाडा व मान आणि बैलूर सीआरसी मधील तळवडे, तीर्थकुंडे, बैलूर, देवाचीहट्टी, गोल्याळी, कौलापूर, कुसमळी, तोराळी, उचवडे, गवळीवाडा, मोरब व सोनारवाडी या शाळांमध्ये सदर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर उपस्थित होते. त्यांनी युवा समितीच्या उपक्रमाविषयी उपस्थित सर्व शिक्षकांना माहिती दिली मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज असून सीमाभागातील मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी शाळा या जगवल्या पाहिजेत आणि याचसाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मराठी शाळेत प्रवेश घ्यावा म्हणून युवा समितीच्या वतीने प्रोत्साहन म्हणून गेली सात वर्षे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते असे सांगितले.

जांबोटी ग्रामपंचायत उपाध्यक्ष श्री. सुनील देसाई यांनी मातृभाषेतून शिक्षण देण्याची सुरुवात स्वतःच्या घरातून केली पाहिजे यासाठी आम्ही जसा पुढाकार घेतला आहे तसाच पुढाकार सर्व शिक्षकांनी व पालकांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता घेतला पाहिजे व आपल्या पाल्यांना मराठी शाळेमध्येच प्रवेश दिला पाहिजे असे सांगितले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना आबासाहेब दळवी म्हणाले इंग्रजी माध्यमाच्या मागे वहावत न जाता खानापुरातील दुर्गम भागातील पालकांनी व शिक्षकांनी मराठी शाळा टिकविल्या आहेत, पण येत्या काळात शिक्षक पालक यांनी अजून जास्त श्रम घेऊन या शाळा टिकविल्या पाहिजेत, तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत असताना कोणताही किंतू परंतु मनात न बाळगता मराठी भाषेची सेवा सुद्धा केली पाहिजे असे सांगितले, यावेळी त्यांनी युवा समितीच्या कार्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला जांबोटी व कणकुंबीचे सीआरपी अधिकारी श्री. विठोबा दळवी, बैलूरचे अधिकारी श्री. महेश पाटील, युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासु सामजी, राजू कदम, सरचिटणीस श्रीकांत कदम, पदाधिकारी आशिष कोचेरी, आकाश भेकणे, प्रवीण कोराने, प्रल्हाद पाटील व सर्व शाळांमधील मुख्याध्यापक तथा सहशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमेश गावडे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बिडी येथील वृद्ध दाम्पत्य आत्महत्या केल्याप्रकरणी गुजरात येथून एकाला अटक

Spread the love  बेळगाव : सायबर गुन्हेगारांनी व्हिडीओ कॉलवरून लाखो रुपये उकळलेल्यावरून बिडी येथील वृद्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *