
खानापूर : खानापूर तालुक्याच्या लोकप्रिय माजी आमदार व खानापूर तालुका डॉक्टर अंजलीताई फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांचा उद्या गुरुवार दि. 22 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्ष व अंजलीताई निंबाळकर फाउंडेशन तथा हितचिंतकांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने उद्या खानापूर येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप, त्यानंतर खानापूर येथील नगरपंचायतमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सफाई कामगार म्हणून काम करत असलेल्या कामगारांना आरोग्य किट वाटप करण्याचा कार्यक्रम व तेथेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी खानापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच डॉक्टर अंजलीताई फाउंडेशन व हितचिंतकानी उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta