खानापूर : येत्या २६ तारखेला खानापूर नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार होती. अध्यक्षपद व उपाध्यक्षपद ही दोन्ही सामान्य महिलासांठी राखीव होती यासंदर्भात खानापूरचे काँग्रेसचे नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी मा. उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि काल उच्च न्यायालयाचा निकाल आला. यामध्ये न्यायालयाने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूकीवर तात्पुरती स्थगिती आदेश दिला असून पुढील सुनावणी २९ ऑगस्ट रोजी होणार आहे, असे नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी सांगितले.
या आदेशाची प्रत श्री. लक्ष्मण मादार यांनी आज तहसिलदार खानापूर यांचेकडे सुपुर्द केली आहे.
लक्ष्मण मादार पुढे म्हणाले की, गेले कित्तेक वर्ष खानापूर नगरपंचायतच्या अध्यक्षपदासाठी एससी प्रवर्गाचे राखीव आरक्षण आले नाही त्यामुळे आमच्या समाजावर अन्याय होतोय आणि हा अन्याय दूर व्हावा म्हणून मी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आणि न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
सध्यातरी या निवडणूकीचे भवितव्य मा. उच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta