Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर तालुक्यातील मळव गावात शर्यतीच्या बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू 

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील मळव या गावात शर्यतीच्या बैलाचा तलावात बुडून मृत्यू झाला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मळव गावातील गणपती पारशेकर हे आपली बैले धुण्यासाठी तलावात गेले होते. रस्त्याच्या कडेला एका दगडाला बैलाला बांधून दुसऱ्या बैलाला धूत असता अचानकपणे रस्त्यावरील गाडीचा हॉर्न वाजला आणि दगडाला बांधलेला बैल उधळला व त्याने थेट दगडासकट तलावात उडी मारली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सदर शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले आहे. तातडीने अग्निशामक दल पोलीस पथकाला पाचारण करण्यात आले व तसेच त्या ठिकाणी पशुसंगोपन खात्याच्या वैद्यांनीही पाचारण करून पंचनामा केला.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *