खानापूर : राजस्थानमधील मद्रास रेजिमेंटच्या मिलिटरी कॅम्प येथे काल शुक्रवारी रात्री झालेल्या रस्ते अपघातात बेळगाव तालुक्यातील इदलहोंड गावाचे जवान बाळाप्पा तानाजी मोहिते (वय 32) हे मृत्युमुखी पडले.
अलीकडेच हवालदार हुद्यावर बढती मिळालेल्या मयत बाळाप्पा मोहिते यांची राजस्थान येथील मद्रास इंजीनियरिंग रेजिमेंट येथे पोस्टिंग झाली होती. काल शुक्रवारी रात्री आपले कर्तव्य पार पाडून बाळाप्पा मोटरसायकलवरून घरी परतत असताना घडलेल्या अपघातात मरण पावल्याचे सांगण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta