खानापूर : मलप्रभा नदीत आज सकाळी एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सदर मृत महिलेची ओळख पटली असून त्या महिलेचे नाव संथू फ्रान्सिस शेरावत (वय 60) भोसगाळी असल्याचे समजते.
सदर महिला ५ सप्टेंबरपासून बेपत्ता होती. या संदर्भात तिच्या भावाने खानापूर पोलीस स्थानकात बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. या संदर्भात पोलिसांनी मृत महिलेच्या भावाला संपर्क करून मृत महिलेची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. भोसगाळी येथील सेंट जोसेफ चर्चमध्ये प्रार्थनेनंतर ख्रिश्चन पद्धतीनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आहे.
Belgaum Varta Belgaum Varta