Wednesday , March 4 2026
Breaking News

जिजाऊ गणेश मंडळाच्या आरतीचा मान खानापूर तालुका वनविभाग अधिकाऱ्यांना!

Spread the love

 

खानापूर : आज संध्याकाळी जिजाऊ गणेश मंडळाच्या गणरायाची आरती वनविभाग अधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी खानापूरच्या एसीएफ सुनिता निंबरगी तसेच नागरगाळीचे एसीएफ शिवानंद मगदूम तसेच खानापूरचे आरएफओ श्रीकांत पाटील, लोंढा आरएफओ तेज साहेब, कणकुंबी आरएफओ शिवकुमार इटनाळ, भिमगड आरएफओ सय्यद नदाफ, तसेच नागरगाळी आरएफओ प्रशांत मंगसुळी साहेब व गोल्याळी आरएफओ संतोष सुंबळी व सोशल फॉरेस्टचे आरएफओ मृत्यूंजय गणाचारी, केएफडी आरएफओ इटगी यांची उपस्थिती होती.
जिजाऊ गणेश मंडळाच्या अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी सर्व वन अधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
तालुक्यातील जनतेस वनखात्याने सहकार्य करावे, अशी विनंती जिजाऊ गणेश मंडळाच्यावतीने तालुक्यातील सर्व वनखात्याच्या अधिकाऱ्यांना यावेळी केली.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *