खानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून लक्ष्मी देवीच्या सोन्याच्या 16 पुतळ्या, तसेच 40 ते 50 तोळा चांदीचे दागिने, कमरपट्टा व इतर, सोन्या चांदीचा किमती ऐवज चोरीला गेला आहे. त्याची किंमत अडीच लाखापर्यंत आहे.
आज सकाळी पुजाऱ्याच्या व ग्रामस्थांच्या लक्षात आली. खानापूर पोलीस स्थानकाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला व ग्रामस्थांकडून तक्रार नोंदवून घेण्यात आली. यावेळी ॲडिशनल एसपी आर बी बसर्गी, खानापूर पोलीस स्थानकाचे पीआय मंजुनाथ नाईक, क्राईम पीएसआय चन्नबसव बबली, तसेच जगदीश काद्रोळी व आदीजण उपस्थित होते. श्वान पथकाने चोरांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही.
या चोरीच्या घटनेमध्ये अडीच लाखाचे दागिने चोरीला गेले आहेत. त्यामध्येअंदाजे अडीच तोळा सोन्याचा दागिना (16 पुतळ्या) 40 ते 50 तोळा दागिने (कमरपट्टा) व इतर दागिने. चोरीला गेले असल्याची तक्रार लोकोळी ग्रामस्थांनी दिली आहे. याबाबत खानापूर पोलीस स्थानकाच गुन्ह्याची नोंद झाली असून, पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta