खानापूर : शाळा ही आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि भविष्याची वाट दाखविणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी कधीही विसरू शकत नाही हे माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा घेऊन दाखवून दिले असून माजी विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी पुढे आल्यास शाळांच्या अधिक प्रमाणात विकास होईल, असे प्रतिपादन हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक किरण देसाई यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या 2005-06 मध्ये दहावी पास झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. प्रारंभी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा पुष्प वर्षाव करून स्वागत करून घेण्यात आले. त्यानंतर शाळेचे माजी मुख्याध्यापक ए. आर. देसाई, मुख्याध्यापक किरण देसाई यासह मेळाव्याला उपस्थित माजी शिक्षकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती फोटो पूजन करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी स्वागत गीत व इशस्तवन नृत्याच्या स्वरूपात सादर केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना किरण देसाई यांनी 18 वर्षानंतर विद्यार्थी एकत्र आले आहेत ही अतिशय चांगली गोष्ट असून माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी अशाच प्रकारे पुढे यावे तसेच माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीपासून सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व माजी विद्यार्थ्यांना शाल व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला 44 इंची एलईडी टीव्ही भेट दिला तसेच हायस्कूलच्या इमारतीला रंगकाम करून देण्याची माजी विद्यार्थ्यांनी दिली आहे
माजी मुख्याध्यापक ए. आर. देसाई यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवाजी हायस्कूलमधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर असून शाळेतील शिक्षकांनी नेहमीच विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न केले आहेत हीच परंपरा सध्याचे शिक्षक पुढे घेऊन जात आहेत त्यामुळे शाळेचा निकाल दरवर्षी उत्कृष्ट लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील शाळेची चांगली प्रगती होईल असा विश्वास व्यक्त केला.
निवृत्त शिक्षक व्ही. डी. पाटील, श्री. मुदकवी, एल. एच. पाटील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पि. के. काकतकर व माजी विद्यार्थी सुहास पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर रागी पाटील, शशिकांत कांबळे, भाग्यश्री दळवी, सारंग सुतार, मारुती देसाई, नितीन देसाई, तुकाराम बोरकर, राजु पाटील, किरण गोपाळ कुट्रे, किरण मेरवा, अश्विनी वाकाळे, सागर सुंडकर, सुनिल कुंभार, सुप्रिया पाटील, मेघा गुरव, जोतिबा पाटील, माया मोगरे, वंदना पाटील, गीता विर, मुक्ता पाटिल आदिनी परिश्रम घेतले