खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर या महाविद्यालयातील कबड्डी खेळाडूनी गेल्या दहा पंधरा दिवसात विविध क्रीडागणे गाजवत आपला खेळातील रूबाब कायम चढता क्रमाने ठेवला आहे.
मराठा मंडळाच्या अध्यक्षा मान. डॉ राजश्रीताई नागराजू यांनी गेल्या महिन्यात जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या खेळाडू विद्यार्थी कल चाचणी दरम्यान संस्थेतील खेळाडू विद्यार्थी व समस्त शिक्षक वर्गाला संबोधन करताना सांगितले होते की “खेळ असा खेळा, की खेळाचा रूबाब वाढला पाहिजे, हारजीत याचं मोजमाप क्रीडाप्रेमी करत राहतील. जिंकलात तर प्रेक्षकांना मनस्वी आनंद झाला पाहिजे आणि हरलत तर, इतकं छान व शिस्तबद्ध खेळूनही हारलात याबद्दल त्यांना हळहळ वाटली पाहिजे.”
याचचं फलित म्हणजे म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील खेळाडू विद्यार्थीनी सर्वस्व पणाला लावून खानापूर तालुका दसरा खेळात उतरल्या असून त्यांनी कबड्डी खेळात तालुक्यात पहिला येणाचा सिलसिला कायम ठेवला. या संघात कॅपन
Belgaum Varta Belgaum Varta