खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या दोन वर्षापूर्वी तहसीलदार म्हणून सेवा बजावलेल्या तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी केवळ दोन वर्षांतच बदलीचा योग आला. तर त्यांच्या जागी बेळगावचे प्रविण जैन हे सोमवारी दि. ३ जानेवारी रोजी तहसीलदार म्हणून रूजू झाले.
सोमवारी दि. ३ रोजी नुतन तहसीलदार प्रविण जैन यांनी तहसीलदार पदाचा पदभार स्विकारला.
तर तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी आपली सुत्रे नविन तहसीलदार प्रविण जैन यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना निरोप तर तहसीलदार प्रविण जैन यांचे स्वागत असा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रेश्मा तालिकोटी होत्या. व्यासपिठावर नुतन तहसीलदार प्रविण जैन, उपतहसीलदार के. वाय. बिद्री उपस्थित होते.
यावेळी बदलीनिमित्त रेश्मा तालिकोटी यांचा तहसीलदार कार्यालयाच्या वतीने सादिक पाच्छापूरे, तालुका नोकर संघाच्यावतीने अध्यक्ष बी. एम. यळ्ळूर, तसेच विविध संघ संघटनांच्यावतीने शाल, पुष्पहार, भेटवस्तू देऊन सत्कार केला.
सदिक पाच्छापूरे, अध्यक्ष बी. एम. यळ्ळूर, अशोक यमकनमर्डी, गुरूलींग स्वामी आदीनी विचार व्यक्त केले.
यावेळी बोलताना नुतन तहसीलदार प्रविण जैन म्हणाले की, खानापूर तालुक्यातील जनता ही लोकप्रिय आहे. तेव्हा सर्वाच्या सहकार्याने तालुक्याचा विकास करू. असे विचार व्यक्त केले.
शेवटी तहसीलदार रेश्मा तालिकोटी म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षांच्या ऐन कोरोनाकाळात तालुक्यातील जनतेने जे सहकार्य केले त्याबदल मी खरोखर आनंदी आहे. अशीच सेवा प्रत्येक तहसीलदाराना मिळाली की तालुक्याचा नक्कीच विकास होतो, असे मत व्यक्त केले. आभार शशिकला कुनगोळ यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta