Wednesday , March 4 2026
Breaking News

कबड्डी स्पर्धेत कसबा नंदगड ग्रामपंचायत संघ विजेता

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा पंचायत यांच्या अखत्यारीत व युवा सबलीकरण व क्रीडा क्षेत्र बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुका क्रीडा महोत्सवात कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात तोपिनकट्टी ग्रामपंचायत संघाचा पराभव करून कसबा नंदगड ग्रामपंचायत संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. कसबा नंदगड ग्रामपंचायतीमध्ये कसबा नंदगड, चन्नेवाडी, भुत्तेवाडी, झुंजवाड खैरवाड, गरबेनहट्टी या गावांचा समावेश असून या कबड्डी संघामध्ये प्रेमानंद, श्रीहरी, प्रमोद, महेश, ओंमकार गणेश, धीरज, अमोघ, शिवम, सरण, कार्तिक यांचा समावेश तर प्रशिक्षक म्हणून चन्नेवाडी व आनंदगड हायस्कूलचे क्रीडा शिक्षक फोंडुराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *