खानापूर : 2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात म. गांधी जयंती साजरी करण्यात येणार आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरातून पदयात्रा काढण्याचे आदेश केपीसीसीने दिले आहेत.
खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे 2 ऑक्टोबर म. गांधी जयंती दिवशी खानापूर परिश्वाड क्रॉस येथून सकाळी ठीक 9 वाजता पदयात्रेला सुरवात होणार असून टिपू सुलतान चौक- चौराशी देवी मंदिर- वाल्मिकी मंदिर-बसवेश्वर पुतळा-आंबेडकर पुतळा अशी पदयात्रा निघणार असून शिवस्मारक येथे पदयात्रेची सांगता होणार आहे. तरी तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, महिला मंडळ, युवक मंडळांनी उपस्थित रहावे तसेच कार्यकर्त्यांनी पांढरा पोशाख आणि गांधी टोपी तर महिला कार्यकर्त्यांनी पांढऱ्या साड्या परिधान कराव्यात असे आवाहन खानापूर काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta