खानापूर : खानापूर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे विजयादशमीचे औचित्य साधून खानापूर शहरात पथसंचलन व सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. १३ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आले होते. येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावरून सुरू झालेले पथसंचलन खानापूर स्टेशन रोड शिवस्मारक चौक बसवेश्वर चौक यांचा केंचापुर गल्ली, चौराशी मंदिर, गुरव गल्ली अशा विविध मार्गावरून काढण्यात आले. त्यानंतर याची स्वामी विवेकानंद शाळेच्या मैदानावर सांगता करण्यात आली. या पथसंचलनात जवळपास १३००हून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग झाला होता. या पथसंचलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पदाधिकारी, आमदार विठ्ठल हलगेकर प्रमोद कोचेरी, संजय कुबल यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी ५.३० वाजता बेळगाव विभाग व्यवस्था प्रमुख सुरेश मोहिते यांचे बौद्धिक विचार झाले.
२७ सप्टेंबर १९२५ रोजी स्थापन झालेल्या संस्थेची सुरुवातीची प्रेरणा म्हणजे चारित्र्य प्रशिक्षण देणे आणि हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी “हिंदू शिस्त” लावणे. हिंदुत्वाची विचारधारा हिंदू समाजाला “बळकट” करण्यासाठी प्रसारित करणे आणि भारतीय संस्कृती आणि तिची सभ्यता मूल्ये टिकवून ठेवण्याच्या आदर्शाला प्रोत्साहन देणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. यासाठी प्रत्येक युवकात देव देश धर्मजागृतीसाठी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाईक होण्यासाठी प्रत्येकाला प्रेरित केले पाहिजे असे प्रबोधन केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून नॅरो तज्ञ व जांबोटी येथील कैवल्य योगचे संस्थापक प्रशांत कटकोळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तालुका कार्यवाह बाबाजी तिप्पणावर यांनी या पथसंचलनाचा कार्यभार सांभाळला.
Belgaum Varta Belgaum Varta