खानापूर : श्री माऊली मंदिर कणकुंबी येथे शनिवार दि. 19 ऑक्टोबर 2024 रोजी खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी मार्गदर्शन आणि औषधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. खानापूर येथील शासकीय दवाखाना तसेच जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात असून या आरोग्य शिबीराचे संयोजक आरोग्य केंद्र कणकुंबी, ग्रामपंचायत कणकुंबी, पारवड, आमटे व गोल्याळी तसेच पंचक्रोशीतील विविध संघ संस्था, पंच मंडळ, ग्रामस्थ, देणगीदार, श्री माऊली मंदिर कणकुंबी व्यवस्थापक मंडळ यांच्या सहकारातून हा उपक्रम होत आहे तरी खानापूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये डोळे तपासणी, मोफत चष्मे, दंतचिकित्सा, रक्तदाब, मधुमेह तपासणी, स्त्रियांच्या आजारावर मोफत तपासणी, मार्गदर्शन आणि औषधोपचार केले जाणार आहेत. शिबीरामध्ये प्रवेश घेणाऱ्यांनी आपल्याबरोबर आधार कार्ड व रेशन कार्ड फोन नंबर नोंदणी करिता आणणे बंधनकारक आहे. प्रवेश नोंदणी शिबीराच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या शिबीरात सर्वांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा असे आवाहन खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. बनोशी यांनी केले आहे
Belgaum Varta Belgaum Varta