Wednesday , March 4 2026
Breaking News

मेरडा गावामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी

Spread the love

 

 

तालुका पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली हलगा पंचायत ग्राम विकास अधिकाऱ्याला सूचना

खानापूर : मेरडा येथे नव्याने गटार बांधतेवेळी जुन्या गटारीसाठी वापरण्यात आलेले दगड कोठे गेले याची सखोल चौकशी करावी तसेच 2014 ते 2024 पर्यंतच्या लेखा परीक्षणाचा अहवाल देण्यात यावा अशी स्पष्ट सूचना तालुका पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हलगा पंचायतीच्या ग्राम विकास अधिकाऱ्यांना केली आहे.
मेरडा गावामध्ये काही महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेली गटार चांगल्या स्थितीत असताना देखील ती गटार फोडून पुन्हा नव्याने गटार बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे सांगत गावातील विष्णू जयवंत पाटील यांनी २० सप्टेंबर रोजी तालुका पंचायत अधिकाऱ्यांची भेट घेऊन हलगा पंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच तक्रारीमध्ये जुन्या गटारीतील दगड घेऊन गेल्याची तक्रार करीत यापूर्वीही अध्यक्षानी दगड घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याची दखल घेत तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत दगड कोठे गेले त्याची सविस्तर माहिती घेऊन तपशील द्यावा तसेच गावामध्ये गटार काम आणि पेव्हर्स घालण्यासाठी किती खर्च करण्यात आला याचा फलक लावण्याची सूचना देखील केली असुन 2014 ते 24 पर्यंतचे लेखापरीक्षणाचा अहवाल देखील पंचायतीला द्यावा लागणार आहे. त्यामूळे गावात एकच चर्चा सुरू झाली आहे

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *