खानापूर : काल सायंकाळी खानापूर जांबोटी मार्गावरील शिवाजी नगर रेल्वे पुलावर काल शुक्रवारी दोन दुचाकींचा अपघात
होऊन, यामध्ये रामगुरवाडी गावचा शंकर धाकलु गुरव जागीच ठार झाला होता. तर त्याचा काका रवळू गुरव व नागुर्डा येथील दुचाकीस्वार अमोल खोबान्ना पाखरे, हे दोघे जखमी गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना बेळगाव येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु काल अपघातात मृत्यु पावलेला शंकर गुरव याचे काका रवळू गुरव यांचे सुद्धा काल रात्रीच निधन झाले असुन आज शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून, रामगुरवाडी येथे दोन्ही मृतदेहावर आणि दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. रामगुरवाडी गावामध्ये एकाच घरात पुतण्या व काका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ रामगुरवाडी ग्रामस्थांवर आली असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.