खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो त्यानिमित्ताने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे केंद्र सरकारचा निषेध म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात येते. येणारा काळा दिन खानापूर तालुक्यात गांभीर्याने पाळण्यात यावा यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. सोमवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी जांबोटी येथे काळ्यादिना संदर्भात जनजागृती करण्यात आली आणि एक नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले.
यावेळी खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, ज्येष्ठ नेते मारुतीराव परमेकर, सरचिटणीस आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, राजाराम देसाई, खजिनदार संजीव पाटील, पांडुरंग सावंत, जयराम देसाई, विठ्ठल देसाई, रवींद्र शिंदे, विजय गुरव, रवींद्र देसाई, वसंत नावलकर, पुंडलिक पाटील, बाबू भरणकर, सहदेव नाईक, कृष्णा महाजन, शामराव सांबवे, मारुती मादार, राजाराम देसाई, चांगप्पा देसाई, भास्कर बिर्जे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta