खानापूर : लक्केबैल येथील प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघाचे सचिव प्रकाश पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून त्यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोसायटीच्या आजी, माजी संचालकासह गावातील तिघेजण अशा सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार सहा जणांना अटक करण्यात आल असून एक जण फरारी असल्याचे समजते.
याबाबत माहिती की, लक्केबैल प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाचे सचिव प्रकाश पाटील यांनी मंगळवारी दुपारी सोसायटीच्या सभागृहात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. मी सुद्धा अवस्थेत त्यांना बेळगाव येथे दाखल करण्यात आले होते. पण उपचाराअभावी बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान प्रकाश पाटील केलेल्या आत्महत्या मागे सोसायटीच्या काही आजी, माजी संचालक व गावातील काहींचा संबंध असून त्यांच्या धमकीमुळे व आर्थिक व्यवहारामुळेच त्यांनी आत्महत्या केली असल्याची तक्रार प्रकाश पाटील यांची पत्नी लक्ष्मी पाटील यांनी केली आहे.
तक्रारीत नमूद केलेल्या माहितीप्रमाणे प्रकाश पाटील यांच्याकडून सदरी व्यक्तीनी दहा लाख रुपये घेतले होते. पण ते देण्यास टाळाटाळ केल्याने मानसिक ताण घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे. यानुसार खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरारी आहे. गेल्या दोन दिवसापासून या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. आत्महत्या केलेल्या ठिकाणी प्रकाश पाटील यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती असे समजते. त्यावरून तसेच त्यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोसायटीच्या एका माजी अध्यक्षसह एक माजी संचालक, दोन माजी संचालक व लक्केबैल व लोकोळी गावातील अन्य तिघांचा समावेश आहे. बुधवारी रात्री उशिरा याबाबत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाली. त्यानंतर गुरुवारी दुपारी प्रकाश पाटील यांचा मृतदेह गावी आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.