Tuesday , March 3 2026
Breaking News

गुंफण मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड

Spread the love

 

बेळगाव : गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबर रोजी खानापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड करण्यात आली आहे.
रंगनाथ पठारे हे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या कमिटीचे पठारे अध्यक्ष होते त्यानी अतिशय चांगल्या प्रकारे संशोधन करून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला आहे. पठारे यांच्या ताम्रपट या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असून महाराष्ट्र सरकार व इतर संस्थांचे देखील त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून गुंफण साहित्य परिषद महाराष्ट्रासह सीमा भागातील विविध गावांमध्ये मराठी साहित्य संमेलन घेत असून आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या संमेलनांना ज्येष्ठ साहित्यिकांनी हजेरी लावली असुन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबत खानापूर येथे आयोजित केले जाणारे संमेलन मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचा निर्णय गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटनेतर्फे घेण्यात आल्यानंतर संमेलनाची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती गुंफण साहित्य परिषदेचे गुणवंत पाटील व शिवस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी दिली असून पठारे यांच्यासह इतर साहित्यिक देखील संमेलनाला हजेरी लावणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *