खानापूर : मणतुर्गे येथे रवळनाथ मंदिराचा स्लॅब भरणी समारंभ गावकऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक वतनदार वासुदेव पाटील हे होते. सुरुवातीला आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर बाळासाहेब शेलार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. गावकर्यांनी मंदिर उभारणीसाठी स्वयंस्फूर्तीने देणगी दिली. यावेळी श्री. प्रकाश नारायण गुरव सेवानिवृत्त पोस्टमन, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. शिवाजी गुंडू गावडे गुरूजी यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रल्हाद शामराव गुंडपीकर, मष्णू चोर्लेकर गुरूजी, अमित राजाराम पाटील व सत्कारमूर्ती शिवाजी गुंडू गावडे गुरूजी यांची भाषणे झाली. प्रारंभी गणेश पुजन अमित राजाराम पाटील उद्योजक गोवा व रवळनाथ पूजन गावचे पुजारी प्रकाश नारायण गुरव, स्लॅब पूजन केएमएफचे माजी अध्यक्ष बाबूराव पाटील व बालगणेश मंडळाचे अध्यक्ष गजानन गुरव यांच्या हस्ते झाले. तर स्लॅब भरणी गावचे पुजारी सातेरी गुरव, कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेव पाटील व गावातील प्रतिष्ठित मंडळी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला हरी अशोक देवलतकर, पिराजी पाटील, रामचंद्र पाटील, विवेक पाटील, चेतन देवलतकर, शशिकांत देसाई, दिनकर चोर्लेकर, प्रशांत देसाई, तुकाराम लोहार, धाकलू देवलतकर, विशाल चोर्लेकर, सुरेश लोहार, रघूनाथ चव्हाण, बालाजी देवकरी, कपिल देवकरी, खेमाण्णा पाटील, सचिन गुंडपीकर, विलास पाटील, नयन देवकरी, सतिश देसाई, नारायण देसाई, शिवाजी पाटील, जितेंद्र गुंडपीकर, सखाराम पाटील, इत्यादी मंडळींनी भरघोस देणगी दिली. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी जिर्णोद्धार कमिटीचे खजिनदार शांताराम पाटील, प्रकाश पाटील, दत्तू नारायण पाटील, मर्याप्पा देवकरी, बळवंत देसाई, दिपक पाटील, विजय भटवाडकर, प्रभाकर बोबाटे, मल्लाप्पा देवलतकर, नामदेव गुरव, रामलिंग चोर्लेकर आणि गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मारुती महादेव देवकरी गुरूजी यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta