खानापूर : खानापूर तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकारी पदावर प्रबेशनरी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना यांनी पदभार स्वीकारला.
पदभार स्वीकारल्यानंतर, दिनेशकुमार मीना यांनी तालुका पंचायत कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खानापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींच्या कारभाराची आणि योजनांची माहिती संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सखोलपणे जाणून घेतली. या बैठकीत तालुका पंचायतीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta