
खानापूर : खानापूर येथील तरुणांनी सध्या जगभरातून होत असलेली सेंद्रिय पदार्थांची मागणी लक्षात घेत गुऱ्हाळ व्यवसायाकडे पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 ते 15 वर्षे आयटी क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेले सौ. स्मितल प्रदीप पाटील, प्रदीप यशवंतराव पाटील आणि त्यांचे सहकारी विशाल नारायणराव चौगुले यांनी खानापूर शहरालगत असलेल्या भोसगाळी कुटीन्हो नगर रस्त्यालगत गुऱ्हाळ सुरू करून सेंद्रिय गुळाला बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहेत.
रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता “चौगुले पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज” या नव्या कंपनीचा शुभारंभ होत आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
राष्ट्रपपती आदर्श शिक्षक आणि महाराष्ट्र एकीकरण समिती सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी हे असणार आहेत तर गुऱ्हाळचे उदघाटन खानापूरचे आमदार श्री. विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते होणार आहे. गणेश पूजन नारायणराव चौगुले यांच्या हस्ते तर “चौगुले पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज”च्या नामफलकाचे अनावरण माजी आमदार दिगंबर पाटील आणि श्रीराम सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र एकीकरण समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते होणार आहे. तर ऊस गाळप माजी आमदार अरविंद पाटील व कार्याध्यक्ष खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती
मुरलीधर पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, अशी विनंती कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे..
Belgaum Varta Belgaum Varta