Sunday , September 20 2026
Breaking News

कॅन्टोन्मेंट भागात रिक्षा पार्किंग शुल्क रद्द करण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील छावणी परिषद क्षेत्रात ऑटो चालकांना पार्किंग शुल्क आकारण्यात येत असल्याचा विरोध करत आज बेळगाव ऑटोचालक आणि मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले.
छावणी परिषद क्षेत्रातील गणेशपूर रोड, छत्रपती धर्मवीर संभाजी चौक, वनिता विद्यालय, गणेशपूर बस स्थानक या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगसाठी छावणी परिषदेने शुल्क आकारणी सुरू केली आहे. प्रत्येक वाहनासाठी 20 ते 30 रुपये शुल्क वसूल केले जात आहे, ज्यामुळे रिक्षा चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाड्याच्या रकमेचा अर्धा हिस्सा पार्किंग शुल्क म्हणून भरावा लागत आहे, यामुळे रिक्षाचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे त्वरित शुल्क आकारणारी धोरण रद्द करण्याची मागणी ऑटो चालकांनी केली आहे. काही ऑटो चालक दिवसा सेवा देतात तर काही चालक रात्री सेवा देतात. मात्र अलीकडे नशा करणाऱ्यांकडून ऑटो चालकांवर हल्ले होत आहेत. शहराला नशामुक्त शहर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. मोफत बससेवेमुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या सीईओंनी पार्किंग शुल्क रद्द करून ऑटो चालकांचे हित पाहावे, असे ऑटो चालक बसवराज आवरोळी यांनी सांगितले.

याआधी एका ऑटो चालकावर दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने हल्ला केला होता. शहर नशामुक्त करण्याची आमची मागणी आहे, अशी मागणी आणखी एका आंदोलक ऑटो चालकाने केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बेळगाव ऑटो चालक आणि मालक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *