खानापूर : कबड्डी हा मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर यांचा हुकुमी खेळ असून गेले अनेक दिवस येथील खेळाडू विद्यार्थीनी तालुक्यातील संघ संघटनानी ठेवलेल्या कबड्डी स्पर्धेत सहभागी होऊन आपली कसब दाखवत पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरताना दिसत आहेत. वजनी गटात अव्वल दर्जाचे प्रदर्शन करणाऱ्या या महाविद्यालयातील या कबड्डी खेळाडू जिल्ह्य़ातील विविध खुल्या कबड्डी स्पर्धेतही आपली चुनुक दाखवित आहेत.
विशेष म्हणजे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या या संघाने मागील महिन्यात रामदुर्ग येथे संपन्न झालेल्या पदवीपूर्व विभागीय स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम येणाऱ्या बेळगावच्या संघात आपलं स्थान निश्चित केले असून येथील क्रीडांगणावर सर्वांचे लक्ष वेधले होते.
खासकरून काॅलेजची खेळाडू कुमारी आरती तोरगल, कुमारी सोनाली धबाले, कुमारी साधना होसुरकर या कब्बड्डी खेळाडूंनी अंगभूत कौशल्यवर भर देत, अव्वल कॅचींग, चढाईची रेडींग व जबरदस्त कव्हर मारत आपले स्थान बेळगाव जिल्हा संघात भक्कम केले होते. सदर खेळाडू विद्यार्थीनी उद्या चिकोडी येथे होणाऱ्या कर्नाटक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बेळगाव जिल्हा कबड्डी संघाचे नेतृत्व करणाऱ्या संघात आहेत.
या कबड्डी खेळाडू विद्यार्थिनींना मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू (हलगेकर) यांचा कबड्डी हा आवडीचा खेळ असून त्यांनी दूरध्वनीद्वारे या विद्यार्थिनीना शुभेच्छा दिल्या, संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. परशराम गुरव, संचालक श्री. शिवाजीराव पाटील यांनी ही अभिनंदन केले असून राज्यस्तरीय कब्बड्डी स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींनी यश मिळवावे अशा भरभरून शुभ कामना व्यक्त केल्या आहेत.
त्याचबरोबर कबड्डी कोच श्री. भरमाजी पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन त्यांना मिळाले असून व कॉलेजचे प्राचार्य श्री. अरविंद पाटील यांचे त्यांना सदैव प्रोत्साहन मिळाले आहे शिवाय प्रा. टी. आर. जाधव, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. मंगल देसाई व प्राध्यापक वर्ग यांच्याही त्यांना शुभेच्छा मिळाल्या आहेत.
विशेष म्हणजे याप्रसंगी माजी विद्यार्थिनी म्हणून उपस्थित राहिलेल्या रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्या शरयू कदम, व्यवस्थापक शामल पाटील, उद्योजक प्रमिला राव यांनीही कबड्डी खेळाडू विद्यार्थिनींना भरभरून शुभेच्छा दिल्या व राज्यस्तरीय स्पर्धेत उज्ज्वल यश मिळवून राष्ट्रीय पातळीवर यांची निवड व्हावी असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.