खानापूर : सरकारी मराठी शाळा शिवाजीनगर खानापूर येथील शिक्षकाची नियोजन पर बदली रद्द करण्याबाबत आज महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सरकारी मराठी प्राथमिक शाळा शिवाजीनगर येथे एकूण 17 मुले शिक्षण घेत आहेत. नियमाप्रमाणे दोन मराठी व एक कन्नड शिक्षक पहिली ते पाचवी वर्गात कार्यरत आहेत असे असताना त्यातील एका शिक्षकाची नियोजन पर बदली अन्यत्र करण्यात आलेली आहे त्यामुळे एकाच मराठी शिक्षकावर पाच इयत्तांची जबाबदारी पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे तरी या दुष्परिणामाचा विचार करून ही नियोजन पर बदली रद्द करावी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशा प्रकारची विनंती करणारे निवेदन आज महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे देण्यात आले आहे.
यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, खजिनदार संजीव पाटील, जांबोटी विभाग उपाध्यक्ष जयराम देसाई, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार, गोपाळराव पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, कृष्णा मन्नोळकर, सागर पाटील व यशवंत पाटील हे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta