खानापूर : खानापूरहून म्हैसूरकडे निघालेली स्कूल बस दुभाजकाला धडकून पलटी झाली. या अपघातात बसमधील मुले किरकोळ जखमी झाली असून चिंता करण्याचे कारण नाही.
याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर येथील शांतिनिकेतन शाळेच्या मुलांची सहल म्हैसूरला गेली होती. सहल संपवून खानापूरला परतत असताना म्हैसूरमधील फाउंटन सर्कलजवळ ही घटना घडली. यामध्ये १० हून अधिक मुले किरकोळ जखमी झाली. बसमध्ये सुमारे ३० मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी मुलांना म्हैसूरच्या केआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.