खानापूर : हलशीवाडी येथील युवा स्पोर्टस आयोजित गाव मर्यादित किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून वासुदेव देसाई याने तयार करण्यात आलेल्या सिंहगड किल्ल्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे तर सोहम देसाई प्रतापगड द्वितीय तर दत्तात्रय देसाई यांच्या मल्हारगडला तृतीय क्रमांक मिळाला आहे.
दरवर्षी युवा स्पोर्टसतर्फे दिवाळीनिमित्त गाव मर्यादित केला स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे गावातील बालचमुना प्रोत्साहन मिळत असून श्रेयांस राजन सुतार (रायगड), ओमकार वामन देसाई (प्रतापगड), श्रेयश रघुनाथ देसाई (सिंहगड), खंडोबा देसाई (मल्हारगड), गौतम देसाई (ता. राजहंसगड) तर स्वरा रुपेश देसाई (सिंहगड) यांनी तयार केलेल्या केल्याने उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत लवकरच बक्षीस वितरण केले जाणार आहे अशी माहिती देण्यात आली
Belgaum Varta Belgaum Varta