खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर या विद्यालयातील कबड्डी खेळाडूंनी गेल्या महिन्याभरात विविध क्रीडांगणे गाजवत आपला खेळातील रुबाब कायम चढत्या क्रमाने ठेवला आहे.
2024- 25 या वर्षाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा चिकोडी या ठिकाणी घेण्यात आल्या. या स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघ उतरला,या संघात मराठा मंडळ ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूरच्या कुमारी साधना होसुरकर, कुमारी आरती तोरगल, कुमारी सोनाली धबाले या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. बेळगाव जिल्हा संघातून खेळताना पहिल्याच सामन्यात बलाढ्य बेंगळुरू संघाचा सहा गुणांनी निसटता पराभव केला यात खेळाडू साधना महेश होसूरकर हीने कबड्डी खेळाचे अव्वल प्रदर्शन करीत संघाला कठीण परिस्थितीत सावरलं. दुसऱ्या सामन्यात गदग जिल्हा संघाचा मोठ्या अंतराने पराभव करीत खेळाडू कुमारी साधना होसूरकर हिने आपला जरशी क्रमांक बारा प्रेक्षकांच्या हृदयात कोरला व उपांत्य पूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केले. मुडबिदरी आलवाज या संघाबरोबर निसटता पराभव या संघाला स्विकारावा लागला पण चित्त्याच्या चपळाईने आक्रमक असणाऱ्या साधना महेश होसुरकर हिची कर्नाटक राज्य संघातील निवड पक्की झाली होती. आता ती राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत ती कर्नाटक कबड्डी संघातून खेळणार असून, हरियाणा येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेत खेळणार आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंच्या पाठीमागे उभी असलेली भक्कम शक्ती आणि प्रेरणास्थान म्हणजे आपल्या मराठा मंडळ संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू असून पुढील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी त्यांनी साधनाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
हे औचित्य साधून मराठा मंडळ ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालय खानापूर यांच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.होता. या सत्कार समारंभाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य अरविंद पाटील, प्रमुख पाहुणे मराठा मंडळ संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री परशराम गुरव, संचालक श्री शिवाजीराव पाटील ,ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राहुल जाधव ,मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. के व्ही कुलकर्णी ,पालक श्री महेश होसुरकर, कबड्डी कोच श्री भरमाजी पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला .
कुमारी रोशनी कंग्राळकर ही विद्यार्थिनी राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघातून रवाना होत आहे.कॉलेजच्या वतीने पाहुण्यांच्या हस्ते हार घालून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी प्राचार्य अरविंद पाटील यानी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थिनींना खेळाचे महत्व सांगत शुभेच्छा पर आपले विचार व्यक्त केले. सत्कार प्रसंगी प्रा. एन एम सनदी, प्रा.जे एफ शिवठणकर, प्रा मनिषा एलजी, प्रा. एन ए पाटील प्रा. नितीन देसाई, प्रा. आरती नाईक, प्रा. ऋतू पाटील, प्रा. दिपाली निडगलकर प्रा. सोनल पाटील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टी आर जाधव यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta