खानापूर : खानापूर – पारीश्वाड मार्गावर दोड्डहोसुर गावानजीक दुचाकी आणि बसचा समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात दोड्डहोसुर येथील दुचाकीस्वार जागीच झाला आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव गोविंद उर्फ संदेश गोपाळ तिवोलीकर रा. दोड्डहोसुर असे आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की. केएसआरटीसीची बस चापगांवकडून खानापूरकडे येत होती, तर गोविंद उर्फ संदेश गोपाळ तिवोलीकर हा दुचकीवरून आपल्या दोड्डहोसुर गावाकडे जात होता. त्यावेळी दुचाकीची धडक बसला बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. खानापूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह खानापूर येथील सरकारी दवाखान्यात आणला असून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
अपघातात मृत्यू पावलेला युवक मालवण या ठिकाणी गवंडी कामा निमित्त राहात होता. काही कामानिमित्त काल मंगळवारी तो आपल्या गावी आला होता, असे समजते. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta