खानापूर : बेळगाव येथे 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी समितीच्या वतीने दरवर्षी महामेळावा घेण्यात येतो यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक सोमवार दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ठीक दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे. तरी खानापूर तालुक्यातील समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले विचार व्यक्त करावेत, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले आहे.