खानापूर : बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी बेळगावात मराठी भाषिकांच्या वतीने समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही सोमवार दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सीमा भागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बेळगाव येथील महामेळाव्याला उपस्थित राहावे म्हणून सर्वत्र महामेळाव्याची जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गुरूवार दि. 4 रोजी आठवडी बाजाराच्या निमित्ताने जांबोटी पेठ, बुधवारी दि. 3 रोजी नंदगड आणि गावात महामेळाव्याच्या जनजागृतीबाबतची पत्रके वाटून महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन म. ए. समितीचे नेते व पदाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी लोकांनी मोठ्या प्रमाणात महामेळाव्याला उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त केला. मेळाव्याचे ठिकाण ऐनवेळी जाहीर करण्यात येणार आहे.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, माजी तालुका पंचायत सभापती मारुतीराव परमेकर, रवींद्र शिंदे, राजू चिखलकर, कृष्णा देसाई, मोहन देसाई, राजाराम देसाई, रवींद्र देसाई, शंकर अर्जूनकर, अरुण देसाई, विठ्ठल राजगड, पंडित नवलकर, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, राजाराम देसाई, विनोद राठोड यांच्यासह ग्रामस्थ.
त्याच्याबरोबर नंदगड मध्ये देखील जनजागृती करण्यात आली. यावेळी म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, समितीचे नेते पुंडलिक चव्हाण, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, प्रकाश चव्हाण, नागाप्पा पाटील, ब्रह्मानंद पाटील, राजाराम देसाई, मोहन गुरव, तानाजी पठाण, गंगुबाई गुरव, सरिता पाटील, सिद्धाप्पा केसरेकर, राजाराम भुतेवाड अभिषेक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.