खानापूर : तिओली देसाईवाडा तालुका खानापूर येथील श्री गणेश मंदिराचा सोळावा वर्धापन दिन 8 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाला. यावेळी सौ. व श्री. नंदकुमार गोविंद देसाई व सौ. व श्री. यशवंत दत्तू देसाई यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. यानिमित्त गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मेजर सुभेदार व खानापूर म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. सभेला ग्रामस्थ व पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात सेवानिवृत्त सुभेदार श्री. महेश पांडुरंग देसाई (नेरसे), निवृत्त इन्स्पेक्टर श्री. राजाराम साताप्पा देसाई, कार्याध्यक्ष खानापूर समिती निरंजन सरदेसाई, निवृत्त सीआरपी तिवोली श्री. गणेश लक्ष्मण पाटील आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी गोपाळ हेब्बाळकर, विठ्ठल पाटील गुरुजी, सहदेव हेब्बाबाळकर, पुंडलिक लाटगावकर, भरत पाटील, देवाप्पा घाडी, पांडुरंग पाटील, यशवंत देसाई, विठ्ठल देसाई, अमृत देसाई, उत्तम देसाई, दीपक देसाई, मारुती देसाई, शाहू देसाई, शंकर देसाई, बळवंत देसाई, निळकंठ देसाई, सटवाप्पा देसाई तसेच गावातील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.