खानापूर : श्री कलमेश्वर को-ऑप. मल्टीपर्पज सोसायटी हालगा या सोसाटीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणूकीत अध्यक्ष म्हणून महाबळेश्वर गावडू पाटील यांची निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून सौ. तेजस्विनी गुरूदास पठान यांची निवड झाली. नागेश पठाण, वसंत सुतार, ओमन्ना केसरेकर, विनायक रजकन्नवर तसेच सुनिता पाटील असे ७ सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या बाजूने मतदान केले तर विरोधकांकडे ५ सदस्य होते. निवडणूक पार पडल्यानंतर हे सर्व ७ सदस्य खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांना भेटण्यासाठी रायगड या निवासस्थानी आले होते.
ताई आज गोवा दौऱ्यावर असल्यामुळे ताईंच्या वतीने सुरेश भाऊ यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
यावेळी सावित्री मादार, निरूपादी कांबळे, प्रकाश मादार, उमेश देवलत्ती, हणमंत पाटील, अर्जुन कट्टीमनी, साईश सुतार, महेश मादार, रवी बस्तवाडकर वगैरे सर्वजण उपस्थित होते.