खानापूर : गोवा प्रदेश काँग्रेसने पक्ष संघटनासाठी आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी सहभाग घेतला.
गोवा प्रदेश काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीला एआयसीसी सचिव, खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी हजेरी लावली. या बैठकीत त्यांनी पक्ष संघटन आणि बळकटीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. डॉ. निंबाळकर यांनी गोवा प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत पक्षाच्या संघटनेसाठी पुढील पावले उचलण्याबाबत चर्चा केली. त्या पक्ष संघटनासाठी सातत्याने महत्त्वाच्या सभा घेत असून, पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत आहेत. डॉ. अंजली निंबाळकर यांनी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी नवी दिशा दिली असून, आगामी काळात पक्षाच्या यशस्वी वाटचालीसाठी पुढाकार घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन आणखी मजबूत होईल, असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta