
खानापूर : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को – ऑप. सोसायटीच्या खानापूर शहरातील शाखेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उद्या बुधवार दि. १ जानोवारी सकाळी ११ वाजता होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक, चेअरमन विलासराव बेळगावकर हे उपस्थित राहतील. यावेळी दिपप्रज्वलन आमदार विठ्ठलराव हलगेकर माजी आमदार दिगंबर पाटील, अरविंद पाटील, तहसीलदार प्रकाश गायकवाड, जिल्हा उपनिबंधक रवींद्र पाटील यांच्याहस्ते होईल. फोटो पुजन आर. बी. बांडगी, अध्यक्ष जिल्हा को – ऑप. सोसायटी युनियन बेळगांव. ऍड. ईश्वर घाडी अध्यक्ष बार असोसिएशन व काँग्रेस तालुका अध्यक्ष तर प्रमुख पाहूणे म्हणून नविन हुलकुंद सी डी ओ खानापूर आर पी जोशी निवृत्त मनेजर, ऍड. व्ही. एन. पाटील, विठ्ठल पाटील चेअरमन व्हनवादेवी को – ऑप. सोसायटी क. नंदगड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक चेअरमन विलासराव बेळगावकर व संचालकानी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta