खानापूर : खानापूर तालुका मराठी प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक संघाचा १४ वा अमृत महोत्सव सोहळा सोमवारी दि./३० डिसेंबर रोजी शिवस्मारकात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष डी. एम. भोसले होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी अध्यक्ष विलास बेळगांवकर, पीएलडी बँक अध्यक्ष मुरलीधर पाटील, माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
सरस्वती फोटो पूजन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार आबासाहेब दळवी व समिती नेते प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. राधाकृष्णन फोटो पूजन अर्बन बॅंक चेअरमन अमृत शेलार व कर्नाटक राज्य शिवसेना उपाध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून अजित पाटील पुणे (गर्लगुंजी), मातृभाषा बचाव समिती अध्यक्ष श्री. अनिल देसाई,
निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. पाटील, पिसेदेव को. ऑप. चेअरमन भाऊराव पाटील, पत्रकार वासुदेव चौगुले, शिक्षक संघटना माजी अध्यक्ष ए. बी. मुरगोड, ज्येष्ठ निवृत्त शिक्षक नारायण पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत आप्पाराव मुतगेकर यांनी केले.
उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी अमृत महोत्सवी निमित्त ७५ वर्षे ओलांडलेले निवृत्त शिक्षक वसंत देसाई (हलशीवाडी), बाबूराव नारायण पाटील (गर्लगुंजी), यल्लापा पाटील, विठ्ठल हट्टीकर, मोहन घाडी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व मानचिन्ह देऊन देऊन सत्कार करण्यात आला.
तर सहस्त्रचंद्र दर्शन सत्कार मुर्ती! ८५ वर्षे पूर्ण केलेले निवृत्त शिक्षक रूद्रापा घारशी, शिवाजी मल्लू पाटील (गर्लगुंजी), बाळकृष्ण पाटील, पुंडलिक पाटील, रामू गुरव, वामन नारायण पाटील (इदलहोंड), कृष्णाजी पाटील, विठ्ठल मोरे, यशवंत पाटील, लक्ष्मण देसाई, कृष्णाजी गावडे, गणपती फटाण, नागो पवार, आदीचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात संघाच्या कार्याबद्दल माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एन. एम. पाटील यांनी केले.