
खानापूर : खानापूर तालुक्यातील अतिघनदाट अरण्य प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबोटी भागातील कणकुंबी नजीक, हुळंद-कणकुंबी रस्त्यावरुन दुचाकी प्रवास करणाऱ्या नागरिकांना भर दिवसा पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. परंतु नागरिकांनी न घाबरता आपल्या दुचाकी थांबवून सदर पट्टेरी वाघाची छबी व व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये टिपला आहे. त्यासाठी या भागातील नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. तसेच वन खात्यानेही याकडे लक्ष देऊन सदर पट्टेरी वाघापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी पुढे येण्याची मागणी या भागातील नागरिकातून होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta