खानापूर : आपल्या शेतात पावर ट्रेलरद्वारे काम करत असताना पॉवर ट्रेलर खाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी, सायंकाळी पाचच्या खानापूर तालुक्यातील चापगाव नजीक घडली.
सदर दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव अशोक पुंडलिक पाटील (वय 60 वर्ष) आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, अशोक पाटील हे सायंकाळी पाचच्या दरम्यान मिरची लागवड करण्यासाठी, आपल्या स्वमालकीचा पॉवर टेलर घेऊन वडेबैल येथील तलावानजीक शेतीची मशागत करत होते. अचानकपणे चुकुन पॉवर ट्रेलरला रिवर्स गिअर पडल्याने, ते तोल जाऊन खाली पडले पॉवर ट्रेलर खाली सापडला. रोटरीच्या चाकाखाली सापडल्याने शेतकऱ्याचे दोन्ही पाय कमरेपर्यंत निकामी झाले. त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत त्याला खानापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पण वाटेतच त्याची प्राणज्योत मावळली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. अशोक पुंडलिक पाटील हे वारकरी व वड्डेबैल गावातील वारकरी मंडळाचे ते प्रमुख होते. त्यांच्या या आकस्मित अपघाती निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नंदगड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta