नंदगड यात्रा कमिटीने घेतली माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची भेट
खानापूर : नंदगड गावची लक्ष्मी यात्रा तोंडावर येऊन ठेपली आहे. निधी अभावी नंदगड भागातील बरीच विकास कामे रखडली आहेत. आमदर फंडातून जेमतेम पाच लाखाचा निधी नंदगड गावासाठी दिला असून हा फंड खूपच कमी असल्याची तक्रार नंदगड यात्रा कमिटीने माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्याकडे केली व यात्रेसंदर्भात प्रशासनाकडून मदत करण्यासंदर्भात अंजलीताईंकडे साकडे घातले. यावेळी नंदगड गावची लक्ष्मी यात्रा आपण सर्वांनी मिळून राजकारण विरहित पार पाडू असे आश्वासन देत आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांनी ग्रामस्थांना सांगितले. यात्रेसंदर्भात यात्रा कमिटी नंदगड ग्रामस्थ तसेच आमदार खासदार यांच्या वेळोवेळी बैठका होऊन देखील यात्रा कमिटी आपल्या समस्या घेऊन डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे आल्यामुळे त्या आवाक् झाल्या व त्यांनी तातडीने पीडीओला फोन लावून कामाचा आढावा घेतला. तसेच उद्या सकाळी 11 वाजता यात्रेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नंदगड गावात प्रत्यक्ष भेट देणार असून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करणार आहेत.
यावेळी यात्रा कमेटी अध्यक्ष सुभाष पाटील पंचायत अध्यक्ष यलाप्पा गुरव, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष महांतेश राऊत, शंकर सोनोळी, वैष्णवी पाटील, नागू पाटील, मन्सूर तहसिलदार, रोहीत गुरव, मस्नू कुंभार्डेकर, राजू कब्बूर, नागू देसुरकर, तुकाराम गावडा, शिवाजी पाटील, तुकाराम गावडा, हणमंत किनयेकर, वगेरे बरेचजण उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta