खानापूर : खानापूर तालुक्यातील गोल्याळी पोस्ट बैलूर येथील रहिवासी 47 वर्षीय सोमनाथ वामन गोल्याळकर हे जठराच्या कॅन्सरने त्रस्त आहेत. त्यांच्यावर केएलई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. तेंव्हा दानशूर व्यक्ती, सेवाभावी संघ -संस्था आणि नागरिकांनी याची नोंद घेऊन आपल्यापरिने होईल तितके सहाय्य करावे आणि सोमनाथ गोल्याळकर यांना जीवदान देऊन त्यांना निरोगी आणि आनंदी भविष्याची भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आर्थिक मदतीसाठी इच्छुकांनी पुढील ठिकाणी आपली मदत पोहोचवावी.
खातेदार : सोमनाथ वामन गोल्याळकर
क्रमांक : 89064270619
आयएफएससी : केव्हीजीबी0002606
Belgaum Varta Belgaum Varta